बदली प्रक्रियेला न्यायालयीन पायघड्या घालणाऱ्या शिक्षकांवर जिल्हा परिषदेचा कडक चपराक – शिस्तभंग कारवाई निश्चित.
पुणे :
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील बदली प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असताना, ५ वर्षांची सेवा पूर्ण न करता सातव्या टप्प्यात बदली मिळवण्यासाठी न्यायालयात गेलेल्या शिक्षकांवर शिष्टभंगाची कारवाई करण्याबाबत शिक्षण विभागाने कडक भूमिका घेतली आहे.
गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की –
- पाच वर्षांचा कालावधी पूर्ण न करता केलेल्या बदल्या नियमबाह्य आहेत.
- अशा प्रकारे न्यायालयात जाणारे शिक्षक शासनाच्या निर्णयाविरोधात जाणूनबुजून पाऊल उचलत आहेत.
- त्यामुळे अशा शिक्षकांवर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येईल.
प्रशासनाचा इशारा
सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी आदेश देत १० दिवसांत नियमबाह्य बदलीच्या प्रकरणांचा आढावा घेऊन संबंधित शिक्षकांकडून स्पष्टीकरण मागविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या